अमरावती येथे लसीकरण रुग्णवाहिका धूळ खात पडून !

प्रतिकात्मक छायाचित्र

अमरावती – राज्यात जलद गतीने लसीकरण व्हावे, जिल्ह्यातून लसींचा साठा तातडीने तालुक्यांच्या ठिकाणी पोचवता यावा, या हेतूने राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पुढाकार घेत महापारेषण विभागाच्या ‘सी.एस्.आर्.’ निधीतून राज्यभर लसीकरण रुग्णवाहिका (‘व्हॅन’) देण्यात आली होती.  अमरावती जिल्ह्यासाठी १८ रुग्णवाहिका देण्यात आल्या होत्या; मात्र जिल्ह्यात गेल्या १० दिवसांपासून वाहनचालक आणि डिझेल यांची व्यवस्था न झाल्याने रुग्णवाहिका धूळ खात पडून आहेत.