चिंचवड (पुणे) येथे उभारणार ‘भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी’ !
वैज्ञानिक अविष्कार नगरीला शास्त्रज्ञांचे नाव देणे अधिक सयुक्तिक ठरेल. शब्दासमवेत त्याची शक्तीही असते. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनाही होईल. – संपादक
पुणे, ३ सप्टेंबर – विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे, भविष्यातील वैज्ञानिक घडवणे यांसाठी चिंचवड स्टेशनलगतच्या ७ एकर क्षेत्रफळावर जागतिक दर्जाची, विज्ञानातील विविध संकल्पनांवर आधारित ‘भारतरत्न राजीव गांधी विज्ञान अविष्कार नगरी’ पुढील ५ वर्षांत उभारण्याचा निर्णय १ सप्टेंबर या दिवशी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत यासाठी १९१ कोटी रुपयांच्या व्ययास मान्यता देण्यात आली.
‘सायन्स पार्क’चे संचालक प्रवीण तुपे म्हणाले, ‘‘आताच्या ‘सायन्स पार्क’ शेजारील जागेत विज्ञान अविष्कार नगरी उभारण्यात येणार असून एकविसाव्या शतकातील भारत घडवण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान यांची आवश्यकता ओळखून हा प्रकल्प उभारला जाईल. पिंपरी-चिंचवड शहरासाठी ही गौरवाची गोष्ट आहे.’’