आग्रा-राजगड-पारगड शिवज्योतीचे हिल रायडर्स अॅडव्हेंचर फाऊंडेशनच्या वतीने स्वागत !
कोल्हापूर, १ सप्टेंबर – आग्रा ते राजगड ते पारगड या शिवज्योतीचे हिल रायडर्स अॅडव्हेंचर फाऊंडेशनच्या वतीने ताराराणी चौकात स्वागत करण्यात आले. ज्योत घेऊन येणार्या शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंचचे सुरज ढोली, कृष्णा भोसले, संकेत गायकवाड यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. यानंतर हिल रायडर्स अॅडव्हेंचर फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रमोद पाटील, विजय देवणे, राहुल चिकोडे, किशोर पडवळ, ऋषीकेश केसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर ही ज्योत शहरातील विविध मार्गांवरून जाऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तिचे परत एकदा स्वागत करण्यात आले.
या वेळी सचिन नरके, भोला यादव,ऑफ रोड असोसिएशनचे प्रताप माने, कु. ओवी माने, अजिंक्य हिरेमठ, पी.जी. जाधव, युवराज साळोखे, अजिंक्य गिरीमल यांसह अन्य उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथे औरंगजेबाच्या नजरकैदेत होते. त्यातून ते सुखरूप सुटून राजगडला पोचले. या घटनेला यंदा ३५५ वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेच्या स्मृती चिरंतन जपल्या जाव्यात, या उद्देशाने शिवज्योत मोहिमेचे आयोजन केले आहे. आग्रा येथून १७ ऑगस्टला शिवज्योतीस प्रारंभ झाला. ४ राज्यांतून प्रवास करत शिवज्योत राजगड, सातारा, कराड, पेठ नाका, ईश्वरपूर, पुलाची शिरोलीमार्गे कोल्हापुरात आली.