सिद्धी नाईकचा खून झाला असल्याचा वडिलांना संशय : नव्याने तक्रार नोंद
सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण
पणजी – सिद्धी नाईक मृत्यूप्रकरणी तिचे वडील संदीप नाईक यांनी संशय व्यक्त केला आहे. ‘माझ्या मुलीला बलपूर्वक पाण्यात बुडवून तिची हत्या करण्यात आली आहे’, असे संदीप नाईक यांनी कळंगुट पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ‘शवविच्छेदन अहवाल आणि सामाजिक माध्यमावर प्रसारित झालेली तिची छायाचित्रे पहाता तिची हत्या झाल्याचा संशय बळावतो’, असे नाईक यांनी तक्रारीत म्हटले आहे