भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार
सिंधुदुर्ग – भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या ३ सप्टेंबरला सिंधुदुर्ग जिल्हा दौर्यावर येत आहेत. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेला घोटाळा आणि संचयनी इन्व्हेस्टमेंटचा घोटाळा यांचा पाठपुरावा करण्यासाठी ते येत आहेत. या वेळी भाजपचे आमदार नितेश राणे समवेत असणार, असे सोमय्या यांनी ट्वीट करून सांगितले आहे.
माजी खासदार सोमय्या यांनी आतापर्यंत अनेक घोटाळे उघडकीस आणले आहेत. सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांवर त्यांनी आरोप केले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह काही नेते सोमय्या यांच्यामुळे अडचणीत आले आहेत. अलीकडेच सोमय्या यांनी राज्यातील घोटाळेबाज ११ नेत्यांची नावे घोषित करून त्यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे म्हटले होते.