सोलापूर येथे चहा पावडरमध्ये रंगाची भेसळ आढळल्याने सव्वादोन टन चहा पावडर जप्त !
सोलापूर – कोंडी (तालुका उत्तर सोलापूर) येथे चहा पावडरमध्ये रंग मिसळला जात असल्याचे आढळल्याने सव्वादोन टन चहा पावडर जप्त करण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई केली. जी.टी. आस्थापनाची २ सहस्र २३० किलो चहा पावडर जप्त करण्यात आली आहे. या चहा पावडरचे नमुने अन्न विश्लेषकांकडे पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल येताच अन्न सुरक्षा आणि मानदे कायदा २००६, नियम आणि नियमने २०११ नुसार पुढील निर्णय घेण्यात येईल, असे साहाय्यक आयुक्त प्रदीपकुमार राऊत यांनी सांगितले.