कसाल येथे मद्यासह ७ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या कह्यात
प्रतिदिन मद्याची अवैध वाहतूक रोखल्याची एकतरी बातमी वृत्तपत्रांत प्रसिद्ध होते; पण ही अवैध वाहतूक कायमची रोखण्यासाठी आणि अशी वाहतूक पुन्हा करण्यास कुणी धजावू नये, यासाठी प्रशासन कोणतीही उपाययोजना करतांना दिसत नाही. मद्याची अवैध वाहतूक पकडणे एवढेच प्रशासनाचे काम आहे का ? – संपादक
सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ तालुक्यातील कसाल येथील रेल्वेपुलाजवळ १ सप्टेंबरला रात्री मद्याच्या अवैध वाहतुकीच्या विरोधात कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ३ लाख २ सहस्र रुपयांचे गोवा बनावटीचे मद्य आणि मद्याच्या अवैध वाहतुकीसाठी वापरलेला ४ लाख ४० सहस्र रुपये किमतीचा टेंपो, असा एकूण ७ लाख ४२ सहस्र रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला. या प्रकरणी टेंपोचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.