लहान मुलांना सकस आणि पोषक आहार मिळावा यांसाठी पालकांमध्ये जागृती करावी ! – सौ. स्वाती शिंदे, नगरसेविका
सांगली, २ सप्टेंबर (वार्ता.) – समाजातील गरीब कुटुंबातील मुले अंगणवाडीत येतात. अंगणवाडी सेविका या मुलांना घडवण्याचे आणि वाढवण्याचे कार्य करतात. या मुलांच्या पोषणासाठी सरकार धान्य, शक्तीवर्धक औषधे यांचा पुरवठा करते. तरी अंगणवाडी सेविकांनी लहान मुलांना सकस आणि पोषक आहार मिळावा, यांसाठी पालकांमध्ये जागृती करावी, असे आवाहन भाजपच्या नगरसेविका सौ. स्वाती शिंदे यांनी केले. सप्टेंबरमध्ये संपूर्ण देशात राष्ट्रीय पोषण अभियान राबवले जाते. त्याचा सांगली येथे प्रारंभ करण्यात आला. त्याच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
या वेळी मुख्यसेविका ज्योती बोराडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. घाडगे, महिला मोर्चा सरचिटणीस गंगा तिडके यांसह अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.