पुणे येथे गटशिक्षणाधिकार्यासह दोघांना ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना अटक !
- कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार ! – संपादक
- सर्वच क्षेत्रांत मुरलेला भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी संबंधितांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! -संपादक
पुणे, २ सप्टेंबर – शिक्षण हक्क कायद्यानुसार (आर्.टी.ई.) मिळणार्या प्रवेश सूचीमध्ये नाव देण्यासाठी ५० सहस्र रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हवेली पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकार्यासह दोघांना अटक केली आहे. दोघांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गटशिक्षणाधिकारी रामदास वालझाडे आणि पालक-शिक्षक संघाचे प्रतिनिधी विकास धुमाळ अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. पारदर्शक कारभारासाठी धुमाळ यांची नेमणूक करण्यात आली होती. शिक्षण हक्क कायद्यानुसार मिळालेल्या प्रवेशाला कागदपत्रे पडताळून ऑनलाईन मान्यता देण्यासाठी ही लाच त्यांनी घेतल्याचे ३१ ऑगस्ट या दिवशी केलेल्या पडताळणीत निष्पन्न झाले आहे.