समस्येमागील मूळ कारण शोधावे !
‘जीवनातील कोणतीही घटना किंवा समस्या याकडे पहातांना तिचे भौतिक कारण शोधणे, तिचे बुद्धीने विवेचन करणे, हे सर्व मानसिक स्तरावरचे असते. हे सर्व वरवरचे असून त्याला ३० टक्केच महत्त्व असते. याउलट ती घटना किंवा समस्या या संदर्भात प्रारब्ध, देवाण-घेवाण हिशोब, क्रियमाणकर्म यांसारख्या आध्यात्मिक घटकांचा विचार केल्यास त्याचे मूळ कारण आध्यात्मिक असल्याचे कळते. याला ७० टक्के महत्त्व असते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले