(म्हणे) ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतातील ‘तालिबानी’ !
राष्ट्रीय जनता दलाचे नेते जगदानंद सिंह यांनी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला !
रा.स्व. संघ ‘तालिबानी’ असता, तर जगदानंद सिंह यांच्यासारखे नेते, राजकारणी जिवंत राहिले असते का ? तोंड आहे म्हणून बोलणार्या अशा नेत्यांवर गुन्हा नोंद करून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे आणि त्यांना सामाजिक शांतता बिघडवल्याच्या प्रकरणी कठोर शिक्षा केली पाहिजे ! – संपादक
पाटलीपुत्र (बिहार) – तालिबान हे केवळ एक नाव नाही, तर अफगाणिस्तानातील एक संस्कृती आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतातील ‘तालिबानी’ आहे. हे लोक इतरांची दाढी कापतात. बांगड्या विकणार्या आणि गाड्यांचे पंक्चर काढण्यासारखे काम करून श्रम करून जगणार्या लोकांना मारहाण करतात; मग अशा लोकांच्या विरोधात आम्ही उभे रहाणार नाही का ? हेच तर जनतेच्या नेत्याचे कर्म आहे, असे फुकाचे विधान राष्ट्रीय जनता दलाचे नेते जगदानंद सिंह यांनी केले आहे. ते एका जाहीर सभेत बोलत होते.
RJD’s Jagdanand Singh calls RSS ‘Taliban of India’; BJP hits back with ‘Hitler Singh’ jibe https://t.co/NVKt6ZxrIa
— Republic (@republic) September 2, 2021
भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी जगदानंद सिंह यांच्यावर टीका करतांना म्हटले की, जगदानंद त्यांचे मानसिक संतुलन बिघडतत चालले आहेत. यासाठी ते हिंसाचारावर विश्वास ठेवणार्या अमानुष तालिबान्यांची तुलना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी करत आहेत.