५३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली वर्धा येथील चि. अनुश्री मिलिंद निखार (वय २ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. अनुश्री मिलिंद निखार एक आहे !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. जन्मापूर्वी
१ अ. ‘मार्गशीर्ष मासातल्या शेवटच्या गुरुवारी मी पूजा करत असतांना मी गरोदर असल्याची मला जाणीव झाली.
१ आ. तिसरा मास
गरोदर असल्याचे समजल्यापासून अध्यात्मातील ओढ वाढणे : जेव्हा मला मी गरोदर असल्याचे कळले, तेव्हापासून माझी अध्यात्माविषयीची ओढ वाढायला लागली. मी प्रतिदिन महाविद्यालयात जात असतांना आगगाडीत २ घंटे ‘श्रीगणेश अथर्वशीर्ष’, ‘हनुमान चालिसा’ आणि ‘देवीकवच’, तसेच सर्व मंत्रजप करत असे.
१ इ. पाचवा मास
‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा जप केल्यावर त्रास हळूहळू न्यून होणे : मला उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होत होता. अशा वेळी मला आईने ‘श्री गुरुदेव दत्त ।’, हा जप करण्याकरता प्रेरित केले. त्यानंतर तो त्रास हळूहळू न्यून झाला.
१ ई. सातवा मास : मला ७ व्या मासामध्ये ‘श्री विघ्नहर्ता गणेश, श्रीकृष्ण आणि झाशीची राणी’ या मालिका पहायला आवडू लागल्या.
१ उ. नववा मास : मी ९ व्या मासामध्ये वर्ध्याला आले. त्यानंतर ‘सोनोग्राफी’मध्ये कळले की, बाळ प्रसूतीच्या दृष्टीने आवश्यक तितके खाली सरकले नाही. तेव्हा माझ्या भावाने मला ‘श्री गुरुदेव दत्त ।’ आणि ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हे जप प्रतिदिन ऐकण्यास सांगितले. त्याने मला प्रतिदिन रामरक्षा म्हणण्यास प्रेरित केले. प्रसूती होईपर्यंत मी प्रतिदिन पोटावर हात ठेवून रामरक्षा म्हणत असे.
१ उ १. प्रसूतीच्या वेळी सर्व देवतांचा धावा करणे आणि बाळ सुखरूप असणे : ९.९.२०१९ या दिवशी माझी प्रसूती साधारण (नॉर्मल) व्हावी; म्हणून सर्व वैद्यकीय उपचार चालू झाले; परंतु मला खोकला असल्याने आणि गर्भातील बाळ खाली न आल्याने माझी आई अन् सासूबाई सतत देवाचा धावा करत होत्या. माझे शस्त्रकर्म (सिझेरिअन) केल्यानंतर बाळ सुखरूप बाहेर आले. शस्त्रकर्म करतांना माझे हिमोग्लोबीन केवळ ६ होते. मी सतत देवतांचा धावा करत होते.
२. जन्मांनतर
२ अ. जन्म ते १ मास
२ अ १. बाळाला सुखरूप पाहून सर्वांना आनंद होणे आणि साक्षात् भगवंतानेच बाळाचे रक्षण केल्याचे जाणवणे : बाळाला सुखरूप पाहून सर्वांना आनंद झाला. आम्ही रुग्णालयामध्ये असतांना आम्हा प्रत्येकाला काही ना काही अडचण होती. मलाही शस्त्रकर्माचा त्रास होत होता; परंतु बाळाला काहीही झाले नाही. तेव्हा वाटले ‘साक्षात् भगवंतच बाळाचे रक्षण करत होता.’
– सौ. चैताली निखार (चि. अनुश्रीची आई)
२ अ २. रात्री स्तोत्र म्हटल्याविना झोप न येणे : ‘बाळाचे नाव अनुश्री ठेवण्यात आले. चि. अनुश्रीला ‘अथर्वशीर्ष आणि हनुमान चालिसा ऐकायला आवडत असे. तिला अथर्वशीर्ष म्हटल्याविना झोपच येत नसे किंवा ती चिडचिड करत असे.
२ आ. दुसरा मास
२ आ १. चि. अनुश्रीने कुटुंबियांना ओळखणे, इतके ‘स्ट्राँग’ बाळ आजपर्यंत पाहिले नसल्याचे महाविद्यालयातील प्राध्यापिकेने म्हणणे अन् त्या वेळी ‘हा रामरक्षेचा प्रभाव असावा ’, असे वाटणे : चि. अनुश्रीला कुटुंबियांची थोडीथोडी ओळख पटायला लागली होती. ती अनोळखी माणसांकडे जात नव्हती. कुणी भेटायला आल्यावर ती आनंदी असायची. आमच्या (आईच्या) महाविद्यालयाच्या प्राध्यापिकेने अनुश्रीला घेतल्यावर म्हटलं, इतके ‘स्ट्राँग’ बाळ आम्ही आजपर्यंत पाहिलेच नाही. त्या वेळी पुन्हा वाटले, ‘हा रामरक्षेच्या पठणाचा प्रभाव असावा.’
२ इ. तिसरा मास
२ इ १. देवाची ओढ : अनुश्रीला देवाची चित्रे आवडायला लागली होती. ती सनातन पंचांगातील देवतांच्या चित्रांना हात लावायची. तिची ओळखण्याची क्षमताही वाढली होती आणि चिडचिडही अल्प झाली होती.’
– सौ. चैताली आणि श्री. मिलिंद निखार (चि. अनुश्रीचे आई-वडील)
२ ई. चौथा मास
२ ई १. नामकरण विधीच्या वेळी कु. अनुश्री रडत असतांना प्रभु श्रीरामाचा पाळणा ऐकल्यानंतर रडायची थांबणे : ‘सौ. चैताली बाळाच्या जन्मानंतर ३ मास माहेरी होती. तोपर्यंत अनुश्री पुष्कळ रडायची आणि चिडचिड करायची. तिचा तोंडवळा हसरा नव्हता. चौथ्या मासात तिला घरी आणल्यानंतर तिचे रडणे आणि चिडणे न्यून झाले अन् तोंडवळ्यावरील तेज वाढून ती लोभसवाणे हसू लागली. २०.१२.२०१९ ला नामकरणविधीच्या वेळी ती पुष्कळ रडत होती; पण प्रभु श्रीरामाचा पाळणा चालू केल्यानंतर ती रडायची थांबली.
२ उ. ५ व्या मासात ती श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून खेळायची आणि देवघरात नेल्यावर देवघरातील श्रीकृष्णाच्या चित्राकडे सारखी बघायची.
२ ऊ. ६ वा मास
२ ऊ १. पाळण्यात झोपवतांना गुरुमाऊलीच तिचा पाळणा हलवत आहे’, असा भाव ठेवणे : अनुश्रीची आई महाविद्यालयात गेल्यावर अनुश्रीला पाळण्यात झोपवतांना ‘गुरुमाऊलीच तिचा पाळणा हलवत आहे’, असा भाव मी ठेवत असे आणि प्रार्थना करत असे. ती ३ घंटे झोपायची आणि समजूतदार असल्यासारखी माझ्याजवळ ३ – ४ घंटे रहायची.’
– सौ. सरिता निखार (चि. अनुश्रीची आजी)
२ ए. ७ मास – ‘आम्ही घरी आल्यापासून ती पुष्कळ आनंदी आणि उत्साही वाटत होती.
२ ऐ. ९ मास
परात्पर गुरुदेवांचा सोहळा पहातांना आनंदी असणे : १३.५.२०२० या दिवशी आम्ही घरी दूरदर्शनवर परात्पर गुरुदेवांचा सोहळा पहात असतांना ती अतिशय आनंदी होती. त्याच दिवशी ती बसायला आणि रांगायला लागली. तिला ‘पू. वामनदादा बघ’, असे सांगितल्यावर ती दूरदर्शनकडे पाहून हसत होती.
२ ओ. १० मास ते आतापर्यंत
२ ओ १. सात्त्विकतेची आवड असणे : तिला तिचे बाबा प्रतिदिन सकाळी कृष्णाच्या चित्राचे दर्शन करायला मंदिरात नेतात. तेव्हा ती ‘जय’ म्हणते. ‘तिला श्रीकृष्ण कुठे आहे ?’, असे विचारल्यावर ती श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहते. तिला ‘विठ्ठल विठ्ठल’ म्हटले की, ती टाळ्या वाजवते. ‘कराग्रे वसते लक्ष्मी.. ’ म्हटल्यावर ती दोन्ही हातांची ओंजळ करते आणि हात तिच्या तोंडवळ्यावरून फिरवते. ‘बजरंग बली हनुमान की जय’ म्हटले की, ‘जय’ म्हणते आणि डोक्याला हात लावते. आरती करत असतांना सर्वांकडे पाहून छान टाळ्या वाजवते. नामजप करत असतांना ती ५-१० मिनिटे मांडीवर शांतपणे बसून रहाते. देवतांची भजने म्हटल्यानंतर ती झोपते.
२ ओ २. आध्यात्मिक उपाय करणे : तिच्या हातावर कापूर दिला, तर ती हातावर हात घासून तोंडवळ्यावर हात फिरवते. तिला विभूती लावायला आवडते.
२ ओ ३. निरीक्षणक्षमता : तिची निरीक्षण करण्याची क्षमता पुष्कळ आहे. ती सर्वत्र मान वळवून पहात असते.
२ ओ ४. तिची आकलन आणि अनुकरणक्षमता चांगली आहे.
२ ओ ५. ती १०-११ मासांच्या मानाने पुष्कळ चपळ वाटायची. ती प्रकृतीने काटक आणि सशक्त आहे.’
– सौ. सरिता निखार, सौ. चैताली निखार आणि श्री. मिलिंद निखार
२ ओ ६. देवाची आवड : ‘चि. अनुश्रीला ‘श्रीकृष्ण आला आहे. कृष्णाजवळ वैजयंती माळ आणि बासरी आहे. तुला दिसली का ?’, असे सांगितल्यावर ती शांत होते आणि हसून ‘हूं’ असा प्रतिसाद देते. त्या वेळी तिच्या डोळ्यांतील भाव बोलके असतात.
२ ओ ७. व्यवस्थितपणा : ती खेळल्यानंतर तिची खेळणी व्यवस्थित भरून ठेवते. तिला काही खाऊ खायला दिला, तर ती स्वत:च्या हाताने व्यवस्थित खाते.
२ ओ ८. ‘श्रीकृष्णासारखे आनंदी आणि हसतमुख बनायचे आहे’, असे सांगितल्यावर पालट होणे : अनुश्रीशी घरच्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणी बोलले, तर ती रडत असे. तेव्हा रात्री झोपल्यावर तिच्या कानात ‘आपल्याला श्रीकृष्णासारखे आनंदी आणि हसतमुख बनायचे आहे’, असे सांगितले. तेव्हापासून तिच्यामध्ये पालट झाला. आता ती सर्वांना आनंदाने प्रतिसाद देते. तिला सर्वांशी खेळायला आवडते.’
– कु. अर्चना रामकृष्ण निखार (आत्या) (८.८.२०२०)
स्वभावदोष : हट्टीपणा
– सौ. चैताली निखार (चि. अनुश्रीची आई) (८.८.२०२०)
यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यू ट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |