गोवा राज्यात ‘डेल्टा प्लस’चा पहिला रुग्ण सापडला
पणजी, १ सप्टेंबर (वार्ता.) – गोवा राज्यातील एका रुग्णाला ‘डेल्टा प्लस’चा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. १९ जुलै २०२१ या दिवशी कोरोनाबाधित झालेला हा रुग्ण आता पूर्णपणे बरा झाला आहे; परंतु पुण्यातील जिनोम सिक्वेंसिंग लॅबकडून गेल्या आठवड्यात मिळालेल्या अहवालामुळे त्या रुग्णाला ‘डेल्टा प्लस’चा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.