पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची ५० वी मकोका कारवाई !

पुणे, १ सप्टेंबर – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आयुक्तपदाची सूत्रे हातात घेतल्यापासून ११ मासांमध्ये जवळपास ५० टोळ्यांवर मकोका लावला आहे. बल्लूसिंह टाकच्या टोळीला अटक करून त्यांनी मोक्कांतर्गत (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) ५० वी कारवाई केली आहे. बल्लूसिंह टाकची टोळी कोथरूड येथे घरफोडी करून पळून जात असतांना ५ जुलै या दिवशी पोलिसांनी अ टक केली होती. या टोळीने वर्ष २०१८ पासून जबरी चोरी, हत्येचा प्रयत्न, घातक शस्त्र बाळगून दहशत माजवणे यांसारखे गंभीर गुन्हे केल्याचे उघड झाल्याने त्यांच्यावर मकोकाची कारवाई करण्यात आली. अशा टोळ्यांसमवेतच सोनसाखळी चोर्‍या, घरफोड्या, तसेच दरोडा टाकणार्‍या ३५० गुंडांवर मोक्का लावला आहे.