‘डिस्मॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या आंतरराष्ट्रीय ‘कॉन्फरन्स’चे आयोजन करणारे, यामध्ये सहभागी होणारे आणि त्यांना साहाय्य करणारे यांच्यावर कारवाई करा !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत ठिकठिकाणी निवेदने
|
अशा प्रकारच्या ‘कॉन्फरन्स’चे आयोजन हे हिंदु धर्माला अपकीर्त करण्याचे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानसांगली, १ सप्टेंबर (वार्ता.) – ‘डिस्मॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’सारख्या ‘कॉन्फरन्स’चे आयोजन हे हिंदु धर्माला अपकीर्त करण्याचे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र असून ते बंद पाडणे आवश्यक आहे. हिंदु जनजागृती समितीने हातात घेतलेले कार्य पुष्कळ चांगले आहे, असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. ‘डिस्मॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या ‘कॉन्फरन्स’च्या संदर्भात हिंदु जनजागृती समिती विविध माध्यमांतून जागृती करत आहे. त्याची माहिती देण्यासाठी श्री. संतोष देसाई यांनी पू. भिडेगुरुजी यांची १ सप्टेंबर या दिवशी भेट घेतली. त्या वेळी पू. भिडेगुरुजी यांनी वरील मत व्यक्त केले. |
कोल्हापूर – ‘डिस्मॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या आंतरराष्ट्रीय ‘कॉन्फरन्स’चे आयोजन करणारे, यामध्ये सहभागी होणारे आणि त्यांना साहाय्य करणारे यांच्यावर कारवाई करा, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात १ सप्टेंबर या दिवशी ठिकठिकाणी निवेदने देण्यात आली.
१. कोल्हापूर शहरात निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी शिवसेना करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, ‘संजय गांधी निराधार योजने’चे माजी अध्यक्ष आणि शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, शिवसेना उपशहरप्रमुख श्री. शशिकांत बीडकर, युवासेना तालुकाप्रमुख श्री. संतोष चौगुले, हिंदु एकता आंदोलनचे श्री. चंद्रकांत बराले, ‘श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समिती’चे सदस्य श्री. प्रमोद सावंत, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री रामभाऊ मेथे, सचिन गुरव, बाबासो मगदूम, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.
२. गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथे उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे नायब तहसीलदार जीवन क्षीरसागर यांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. वामन बिलावर यांनी निवेदन दिले.
३. शाहूवाडी येथे तहसीलदार गुरु बिराजदार यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदुत्वनिष्ठ श्री. रमेश पडवळ, श्री. भरत पाटील, माजी नगराध्यक्ष श्री. राजू भोपळे, श्री. प्रकाश कुरडे, श्री. सुरेश डवरी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी, डॉ. संजय गांधी उपस्थित होते.
अंबेजोगाई (जिल्हा बीड) – येथील उपविभागीय दंडाधिकारी शरद झाडके यांच्या वतीने नायब तहसीलदार बाहेती यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. मंगेश बारस्कर, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते सर्वश्री हनुमंत साने, भवानी शंकर शर्मा, सुदर्शन नरवणे, विश्वंभर देशपांडे, पद्मनाभ देशपांडे आदी उपस्थित होते.
सोलापूर – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील महसूलच्या तहसीलदार सौ. अंजली मरोड यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री दत्तात्रय पिसे, सतीश कुंचपोर, बालराज दोंतुल, धनंजय बोकडे आदी उपस्थित होते. या वेळी सौ. अंजली मरोड यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हे निवेदन त्वरित पुढे पाठवण्याचे आश्वासन दिले.
धाराशिव – येथील नायब तहसीलदार कुलदीप कुलकर्णी यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी श्री. संतोष पिंपळे आणि श्री. भगवान श्रीनामे आदी समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – येथील नायब तहसीलदार शिंदे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री अमित कदम, दीपक पलंगे आणि विनोद रसाळ आदी धर्मप्रेमी उपस्थित होते.
जिल्हा सांगली
१. मिरज येथे प्रांताधिकारी कार्यालयात श्रीमती टी.एस्. डांगे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी बजरंग दलाचे संयोजक श्री. आकाश जाधव, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सचिन भोसले, हिंदुत्वनिष्ठ श्री. पप्पू पेंढे, श्री. प्रकाश कुलकर्णी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण कुलकर्णी उपस्थित होते.
२. विटा येथे नायब तहसीलदार संतोष महादेव राजे यांना निवेदन देण्यात आले.