शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे आणि भाजपचे आमदार अतुल सावे यांसह भाजप-सेना पदाधिकार्यांविरुद्ध गुन्हे नोंद !
संभाजीनगर येथील गजानन महाराज मंदिरासमोर आंदोलन केल्याचे प्रकरण
संभाजीनगर – २ दिवसांपूर्वी भाजपकडून राज्यभर मंदिरे उघडण्यासाठी शंखनाद आंदोलन करण्यात आले होते. येथील श्री गजानन महाराज मंदिरासमोर आंदोलन केल्याप्रकरणी भाजपचे आमदार अतुल सावे यांच्यासह २१ जणांविरुद्ध, तसेच गर्दी जमवून कावड यात्रा काढल्याप्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि आमदार अंबादास दानवे यांसह १६ जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. आमदार सावे यांच्यासमवेत भाजपचे शहराध्यक्ष संजय केणेकर, प्रवीण घुगे यांच्यासह प्रमुख नेते, महिला पदाधिकारी यांच्या विरोधात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.