वायू प्रदूषणामुळे भारतियांचे आयुष्य ९ वर्षांनी अल्प होण्याची शक्यता ! – शिकागो विद्यापिठातील ऊर्जा धोरण संस्थेचा अहवाल
विज्ञानाने केलेल्या कथित प्रगतीताच हा परिणाम आहे ! याकडे तरी तथाकथित विज्ञानवादी डोळसपणे पहातील का ? – संपादक
नवी देहली – पुढील काळात वायू प्रदूषणामुळे सुमारे ४० टक्के भारतियांचे आयुष्य ९ वर्षांनी अल्प होण्याची शक्यता आहे, असा अहवाल शिकागो विद्यापिठातील ऊर्जा धोरण संस्थेने (‘ई.पी.आय.सी’ने) जारी केला आहे.
Air pollution may reduce life expectancy of Indians by nine years, says study https://t.co/D2ZZn5BCoJ
— BBC Asia (@BBCNewsAsia) September 1, 2021
या अहवालात म्हटले आहे की,
१. नवी देहलीसह मध्य, पूर्व आणि उत्तर भारतातील ४८ कोटी लोक मोठ्या प्रमाणात प्रदूषित भागांमध्ये रहातात.
२. स्वित्झर्लंडमधील ‘आयक्यू एअर’ आस्थापनच्या मते, वर्ष २०२० मध्ये सलग तिसर्या वर्षी नवी देहली जगातील सर्वांत प्रदूषित राजधानी होती. (हे देहलीत आतापर्यंत सत्तेत असलेल्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक) गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दळणवळण बंदी घालण्यात आली. या काळात नवी देहलीच्या २ कोटी लोकांनी प्रदूषणरहित स्वच्छ श्वास घेतला.
३. असे असले, तरी जवळच्या पंजाब आणि हरियाणा राज्यांमध्ये शेतकर्यांनी शेतातील तण (लागवड केलेल्या पिकासमवेत वाढलेल्या अनावश्यक वनस्पती) जाळल्यामुळे पुन्हा हिवाळ्यात देहलीतील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.