परिवहनमंत्री अनिल परब यांनी मागितली २ आठवड्यांची मुदत !
मुंबई – चौकशीसाठी उपस्थित रहाता यावे, यासाठी परिवहनमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी अंमलबजावणी संचालनालयाकडे २ आठवड्यांची मुदत मागितली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने अनिल परब यांना नोटीस पाठवून ३१ ऑगस्ट या दिवशी सकाळी ११ वाजता चौकशीला उपस्थित रहाण्यास सांगितले होते. त्यावर अनिल परब यांनी पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे चौकशीला उपस्थित रहाण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी अंमलबजावणी संचालनालयाकडे केली आहे, तसेच नोटीसमध्ये चौकशीचे कारण नमूद करण्याची विनंती केली आहे.