वर्ष २०१९ मध्ये योजनापूर्वक भाजप आणि शिवसेना यांच्यात दुरावा निर्माण करण्यात आला ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
मुंबई – केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या वेळी भाजप आणि शिवसेना यांच्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. वर्ष २०१९ मध्ये शिवसेना-भाजपमध्येही काहींनी जाणीवपूर्वक भाजप आणि शिवसेना यांच्यात दुरावा निर्माण केला, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींपुढे केले.
२०१९ मध्ये शिवसेना-भाजपामध्ये काहींनी जाणीवपूर्वक दुरावा निर्माण केला. केंद्रीय मंत्री श्री. नारायण राणे यांच्या यात्रे दरम्यानही हा दुरावा निर्माण करण्याचा पुन्हा प्रयत्न झाला. परंतु खुर्चीचा मोह असणाऱ्या उद्धव ठाकरे यांना ही गोष्ट कळत नसावी ! pic.twitter.com/RJwtRG1Ddc
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) August 31, 2021