मथुरेमध्ये दारू आणि मांस यांच्या विक्रीवर सरकारकडून बंदी
या व्यावसायिकांनी दुधाची विक्री करावी !- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा सल्ला
देशातील प्रत्येक तीर्थस्थानी अशा प्रकारची बंदी घालण्याचा आदेश केंद्र सरकारने द्यावा, असेच हिंदूंना वाटते ! हे उत्तरप्रदेश सरकारला शक्य आहे, तर केंद्र सरकार, तसेच अन्य भाजप शासित राज्ये यांनाही ते सहज शक्य असणार, यात शंका नाही ! – संपादक
मथुरा (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरेमध्ये दारू आणि मांस यांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा आदेश दिला आहे. ३० ऑगस्टपासूनच हा आदेश लागू करण्यात आला आहे. येथे ‘कृष्णोत्सव २०२१’ या श्रीकृष्ण जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ही माहिती दिली.
CM Adityanath announces ban on sale of liquor & meat in Mathura on eve of Janmashtami https://t.co/T16orBxGJQ
— Republic (@republic) August 31, 2021
१. योगी आदित्यनाथ म्हणाले की, मांस आणि दारू यांची दुकाने असणार्यांनी आता दूध विक्री करून मथुरेला पुन्हा एकदा जुनी ओळख मिळवून द्यावी. मथुरा पूर्वी चांगल्या प्रतीचे दूध उत्पादन करणारे शहर म्हणून ओळखले जात होते.
२. योगी आदित्यनाथ यांनी भगवान श्रीकृष्णाकडे कोरोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी प्रार्थना केली. (अशी प्रार्थना किती शासनकर्ते करतात ? – संपादक) ‘आम्ही आधुनिक तंत्रज्ञान आणि संस्कृती, तसेच अध्यात्म यांचा सुरेख मेळ घालून मथुरेचा बृज हा भाग विकसित करण्याचा प्रयत्न करत आहोत’, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.