दावी गुरूंची लीला… गुरुलीला सत्संग ।
आमच्या साधनेची घडी बसवण्या आला आपत्काळ ।
किती कृपा गुरुदेवांची आहे आम्हावर ।
देऊन सत्संग अन् दिशा करण्या मात प्रसंगावर ।
आम्हाला अनुभवण्यास देती हा कृतज्ञताकाळ ।। १ ।।
अशीच एक कृपा झाली आम्हावर गुरुदेवांची ।
प्रतिदिन अनुभवती साधकजन लीला ‘गुरुलीला सत्संगा’ची (टीप १) ।
हा सत्संग म्हणजे अखंड उधळण दैवी चैतन्याची ।
प्रत्येक क्षणी अनुभवतात भक्तीगंगा गुरुदेवांची ।। २ ।।
साधक सांगतात जेव्हा प्रयत्न सत्संगात ।
दाटून येते कृतज्ञता शब्दाशब्दांत ।
ऐकणारेही चिंब भिजून जातात कृपावर्षावात ।
अवतरते साक्षात् गुरुमाऊली प्रत्येकाच्या अंतःकरणात ।। ३ ।।
अनुभूतीसह स्वतःच्या चुकाही सांगतात मोकळेपणाने ।
मिळता दृष्टीकोन साधनेचा प्रयत्न करतात कृतज्ञताभावाने ।
मनीषाताईचा (टीप २) भाव असे सर्व सूत्रे होतात केवळ गुरुकृपेने ।
गुरुलीला सत्संग हा होत आहे चैतन्य अन् दैवी ओघाने ।। ४ ।।
या सत्संगामुळे शून्यातून प्रयत्न आरंभ झाले साधकांचे ।
अनुभवत आहेत प्रत्येक दिवस आनंदक्षण व्यष्टी प्रयत्नांचे ।
आता सतत मनाला लागली ओढ करण्या स्मरण गुरुदेवांचे ।
प्रतिदिन गुरुभक्तीची प्रेरणा देत आहेत प्रयत्न हे सहसाधकांचे ।। ५ ।।
सत्संगातून जेव्हा स्वभावदोष-अहं निर्मूलन प्रक्रिया चालू झाली ।
चैतन्य अन् संकल्प यांची सर्वांनी अनुभूती घेतली ।
काय किमया आहे कळत नाही या याकाळाची ।
प्रत्येक जण होत आहे अंतर्मुख, ही तर खरेच लीला भगवंताची ।। ६ ।।
वाढली आम्हा सर्वांची गुरुदेवांवरील अढळ श्रद्धा या सत्संगाने ।
अखंड गुरुभक्ती चालू झाली तळमळीने अन् भावाने ।
गुरुलीलेनेच गुरुचरण प्राप्तीचे ध्येय निश्चित झाले ।
घनघोर आपत्काळात गुरुलीला सत्संग मिळाला ।
सर्व साधक कृतार्थ झाले ।। ७ ।।
टीप १ – पुणे जिल्ह्यात साधकांचे साधनेचे नियमित प्रयत्न व्हावेत; म्हणून हा सत्संग चालू आहे.
टीप २ – गुरुलीला सत्संग घेणार्या पुणे येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मनीषा पाठक
भगवंता, या सत्संगाचा लाभ करून घेऊन तुझ्या चरणांची अखंड भक्ती करण्यासाठी तूच आमच्याकडून प्रामाणिकपणे अन् कृतज्ञताभावाने प्रयत्न करवून घे. देवा, या सत्संगरूपी प्रसादाप्रती कोटी कोटी कृतज्ञता !
गुरुचरणी अर्पण,
– सायली जाधव, भोर, पुणे (१५.५.२०२०)
या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |