बनावट देयकांद्वारे ‘जी.एस्.टी.’ परतावा मिळवणार्या उद्योगसमुहाच्या गोदामांवर धाडी !
गोव्यासह महाराष्ट्रात ४४ ठिकाणी टाकलेल्या धाडीत १६० कोटी रुपयांचा घोटाळा उघड
मुंबई – लोखंडविक्रीची बनावट ई-देयके सिद्ध करून ‘जी.एस्.टी.’चा परतावा मिळवणार्या एका उद्योगसमुहाच्या गोदामांवर प्राप्तीकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नाशिक, नगर येथे, तर गोवा येथे एकाच वेळी ४४ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. यातून १६० कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाला आहे.
या धाडीमध्ये ३ कोटी रुपयांच्या रोख रकमेसह ५ कोटी २० लाख रुपयांचे दागिने आणि १ कोटी ३४ लाख रुपयांची चांदी प्राप्तीकर विभागाने कह्यात घेतली आहे. ही सर्व मालमत्ता बेहिशेबी असल्याचे या उद्योगसमुहाने मान्य केले आहे. याविषयी अन्वेषण चालू आहे.