भगवान श्रीकृष्णाच्या या गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का ?
३१ ऑगस्ट २०२१ या दिवशी ‘गोपाळकाला’ आहे. त्या निमित्ताने…
१. भगवान श्रीकृष्णाच्या रथाचे नाव ‘गरुडध्वज’ होते आणि त्याच्या सारथ्याचे नाव ‘दारूक/बाहुक’ होते.
२. भगवान श्रीकृष्णाच्या धनुष्याचे नाव ‘शारंग’ असून त्याचे प्रमुख आयुध ‘सुदर्शनचक्र’ होते. ते चक्र अलौकिक, दिव्यास्त्र आणि देवास्त्र तिन्ही रूपांमध्ये कार्य करू शकत होते. श्रीकृष्णाकडे तुल्यबळ आणि विध्वंसक अशी आणखी दोन अस्त्रे होती, ती म्हणजे पाशुपतास्त्र (जे केवळ शिव, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्याकडे होते) आणि प्रस्वपास्त्र (हे केवळ शिव, वसुगण, भीष्म आणि श्रीकृष्ण यांच्याजवळ होते.)
३. भगवान श्रीकृष्णाच्या खङ्गाचे (तलवारीचे) नाव ‘नंदक’, गदेचे नाव ‘कौमुदी’ आणि शंखाचे नाव ‘पांचजन्य’ होते. तो शंख पाटलवर्णी (गुलाबी रंगाचा) होता.
४. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मानंतर त्याच्या स्थानी कारावासात असलेल्या यशोदा कन्येचे नाव ‘योगमाया’ होते, जी आज ‘विंध्यवासिनीदेवी’ या नावाने पूजली जाते.
५. ‘एकानंगा’ किंवा ‘एकांगा’ ही यशोदेची कन्या श्रीकृष्ण गोकुळ सोडून मथुरेला गेल्यानंतरची कृष्णाची बहीण आहे.
(संदर्भ : मासिक ‘वैदिक उपासना’, १६ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०१९)