श्रीकृष्ण अन् श्रीगुरु आहेत एकरूप ।

आज श्रावण कृष्ण पक्ष अष्टमी (३० ऑगस्ट) या दिवशी ‘श्रीकृष्ण जयंती’ आहे. या निमित्ताने…

परात्पर गुरु डॉ. आठवले

गुरूंच्या नयनांतूनी
चैतन्य मिळे ।
मुखातून अनमोल
संदेश मिळे ।। १ ।।

हातांतून आशीर्वाद मिळे ।
चरणांतून
शक्ती मिळे ।। २ ।।

कु. संस्कृती वाघ

हे गुरूंचे रूप बघूनी
नयनांना आनंद मिळे ।
अन् मनालाही
उत्साह वाटे ।। ३ ।।

गुरुमाऊलीचे रूप
हृदयात वसे ।
मनात गुरुमाऊलीसाठी
कृतज्ञता असे ।। ४ ।।

सुंदर हे रूप, सुंदर हे ध्यान ।
आश्रमात चैतन्य मिळे भरभरून ।। ५ ।।

श्रीकृष्ण अन् श्री गुरु आहेत एकरूप ।
तेजस्वी तोंडवळा अन् गोड स्मितहास्य ।। ६ ।।

– कु. संस्कृती मच्छिंद्र वाघ (वय १६ वर्षे), लासलगाव, नाशिक. (१९.९.२०१९)