श्रीकृष्णाच्या लीलेपुढे मी शरणागत होत असे !

आज श्रावण कृष्ण पक्ष अष्टमी (३० ऑगस्ट) या दिवशी ‘श्रीकृष्ण जयंती’ आहे. या निमित्ताने…

सौ. कस्तुरी भोसले

मोहमायेचे बंधन तोडूनी ये ।
मनमोहन मजसी
साद घालत असे ।। १।।

साधना आणि सत्सेवा
करवून घेत असे ।
मन माझे हळू हळू
शुद्ध करत असे ।। २।।

मम अहं आणि
दोष दाखवत असे ।
मज जागृत करूनी
कृतीप्रवण करत असे ।। ३।।

अहं घालवूनी विनम्रता शिकवत असे ।
दोष घालवूनी मज सद्गुणी बनवत असे ।। ४।।

ही प्रक्रिया करतांना मला हळूवारपणे जपत असे ।
माझा क्रोधाग्नि शमवून मला शांत करत असे ।। ५।।

मला भयमुक्त करून निर्भय बनवत असे ।
मत्सराचे विष दूर सारूनी मज प्रेमामृत पाजत असे ।। ६।।

सप्तचक्रातील एकेक चक्र शुद्ध करत असे ।
मला पिंडी ते ब्रह्मांडी यात्रा घडवत असे  ।। ७।।

माझ्याकडून गुरुकृपायोगानुसार साधना करवूनी घेत असे ।
जन्ममृत्यूचा फेरा चुकवण्या
माझे एकेक पाऊल पुढे नेत असे ।। ८।।

मम चित्तातील मलीनता नष्ट करूनी ।
माझे रूप साजिरे करत असे ।। ९।।

स्वतःला पाहून मीच मुग्ध होत असे ।
श्रीकृष्णाच्या लीलेपुढे मी शरणागत होत असे ।।  १०।।

जगद्गुरु श्रीकृष्णाच्या प्रीतीचे ।
बासरीचे सूर कानी माझ्या गुंजत असे ।। ११।।

माझे निजधाम श्रीकृष्णचरणच असे ।
अशी मजला आस लागत असे ।। १२।।

भगवंताचे हे प्रीतीरूप पाहून मी मोहित होत असे ।
अखंड भगवद्भक्तीचे वरदान देण्या
त्यास विनवत असे ।। १३।।

– श्रीकृष्णाला समर्पित,

आधुनिक वैद्य (सौ.) कस्तुरी भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.८.२०२१)