धारावी (मुंबई) येथे सिलिंडरच्या स्फोटात १४ जण घायाळ !
मुंबई – धारावी येथील शाहूनगर येथे घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन १४ जण घायाळ झाले. यांतील ४ जणांची प्रकृती गंभीर असून १० जणांची प्रकृती स्थिर आहे. स्फोट इतका भयंकर होता की, यामुळे बाजूच्या घरांनाही आग लागली. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या २ गाड्या घटनास्थळी पोचल्या आणि त्यांनी आगीवर वेळीच नियंत्रण मिळवले. आगीत घायाळ झालेल्या व्यक्तींवर सध्या शीव रुग्णालयात उपचार चालू आहेत.