महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लागू होणार; मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री
मुंबई – केरळ राज्यातील ओणम सणामुळे होणारा कोरोनाचा वाढता संसर्ग पहाता केंद्रशासनाने रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सूचना राज्यांना केली आहे. केंद्रशासनाच्या आदेशावर कार्यवाही होईल; मात्र याविषयीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.
या वेळी राजेश टोपे म्हणाले, ‘‘ज्या जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण नाहीत, तेथे शाळा चालू होऊ शकतात का ? याची चाचपणी चालू आहे. ५ सप्टेंबरपर्यंत सर्व शिक्षक आणि संबंधित कर्मचारी यांच्या लसीकरणाचे विशेष नियोजन करण्यात येणार आहे.’’