काबुल विमानतळावर लवकरच पुन्हा आक्रमण होण्याची शक्यता ! – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन
काबुल (अफगाणिस्तान) – काबुल विमानतळावर लवकरच पुन्हा आतंकवादी आक्रमण करू शकतात, अशी चेतावणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी दिली आहे. दूतावासाने अमेरिकी नागरिकांना त्वरित काबुल विमानतळाच्या आसपासच्या भागांतून माघारी फिरण्याचे आदेश दिले आहेत. यांत दक्षिण प्रवेशद्वार, पंजशीर पेट्रोल स्टेशनजवळील प्रवेशद्वार आणि नवीन मंत्रालयाजवळील भागांचा समावेश आहे. यासह अमेरिकी नागरिकांना विमानतळाच्या दिशेने प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
US military commanders believe that another terror attack like the deadly suicide bombing at Kabul airport is “highly likely in the next 24-36 hours,” President Joe Biden warned Saturday#TalibanTakeover #AfghanistanCrisis https://t.co/hmFl9zpWWs
— Hindustan Times (@htTweets) August 29, 2021