श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त ‘बालसंस्कार’ संकेतस्थळावरून घेण्यात येत आहे ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येत असलेला नवा उपक्रम

मराठी, हिंदी, कन्नड, इंग्रजी आणि मल्ल्याळम् भाषिक जिज्ञासूंचा उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई – श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्णाविषयी ज्ञान व्हावे, यासाठी श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित २५ प्रश्न असलेली विशेष ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘बालसंस्कार’ या संकेतस्थळावरून घेण्यात येत आहे. ही प्रश्नमंजुषा मराठी, हिंदी, कन्नड, इंग्रजी आणि मल्ल्याळम् या भाषांमध्ये उपलब्ध असून त्या त्या भाषांतील जिज्ञासूंकडून सोडवण्यात येत आहे. जीवनात आनंद कसा घ्यावा ? हे विविध लीलांच्या साहाय्याने शिकवणार्‍या भगवान श्रीकृष्णाविषयी सध्याच्या युवा पिढीला ज्ञात व्हावे, यासाठी ही प्रश्नमंजुषा उपयुक्त ठरत आहे. ही प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

या ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषेमध्ये ‘श्रीकृष्ण आणि बलराम यांनी कोणत्या गुरूंकडून शिक्षण प्राप्त केले ?’, ‘श्रीकृष्णाने किती दिवसांमध्ये १४ विद्या ६४ कला शिकून घेतल्या होत्या ?’, ‘श्रीकृष्णाची सुदाम्याशी प्रथम भेट कुठे झाली ?’, ‘युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून कोणते व्रत केले होते ?’, असे विविध प्रश्न विचारण्यात आले आहेत. ‘प्रश्नमंजुषा सोडवल्याने ज्ञानात पुष्कळ भर पडत आहे’, अशा प्रतिक्रियाही जिज्ञासूंकडून येण्यास प्रारंभ झाला आहे.

प्रश्नमंजुषा सोडवण्यासाठी लिंक

१. मराठी – http://balsanskar.com/marathi/quiz-krishna-janmashtami

२. हिंदी – http://balsanskar.com/hindi/quiz-krishna-janmashtami

३. इंग्रजी – http://balsanskar.com/quiz-krishna-janmashtami

४. कन्नड – http://balsanskar.com/kannada/quiz-krishna-janmashtami

५. मल्ल्याळम् – http://balsanskar.com/malayalam/quiz-krishna-janmashtami