मालवण येथे आज तेली समाज उन्नती मंडळाची सर्वसाधारण सभा

प्रातिनिधिक छायाचित्र

सावंतवाडी – तेली समाज उन्नती मंडळ, मालवणच्या सर्व आजीव सभासदांची सर्वसाधारण सभा २९ ऑगस्ट २०२१ या दिवशी सकाळी ११ वाजता संत पादुका मंदिर, देऊळवाडा, मालवण येथे आयोजित केली आहे. कोरोनाविषयीचे नियम पाळून सर्वांनी सभेला उपस्थित रहावे. सभेत वर्ष २०२०-२१ चा वार्षिक जमाखर्च सादर करण्यात येणार आहे, तसेच वर्ष २०१८ ते २०२१ हा कालावधी असलेल्या पदाधिकारी मंडळाची मुदत संपत आली असून या सभेमध्ये वर्ष २०२२ ते २०२४ या कालावधीसाठी पदाधिकारी मंडळाची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे या सभेला सर्व सभासदांनी वेळीच उपस्थित रहावे, असे आवाहन तेली समाजाचे अध्यक्ष सुरेश अर्जुन नेरूरकर यांनी केले आहे.