कोरोनाचा बनावट नकारात्मक अहवाल सादर केल्याच्या प्रकरणी ७ धर्मांधांना अटक
देशात असे एकही गुन्हेगारी कृत्य नाही, जे धर्मांध करत नाहीत ! – संपादक
मंगळुरू (कर्नाटक) – केरळ राज्यातून कर्नाटकमध्ये येण्यासाठी कोरोनाचा बनावट नकारात्मक अहवाल सादर केल्याच्या आरोपावरून तलपाडी सीमाभागात २ दिवसांत ४ वेगळ्या प्रकरणात केरळचे ६ आणि कर्नाटकचा १ अशा एकूण ७ धर्मांधांना मंगळुरू पोलिसांनी अटक केली. केरळमधील अब्दुल तमीम, चिरुवत्ती येथील हसीन, हादिल, कबिर ए.एम्., इस्माईल अबुबकर यांना, तर मंगळुरूच्या महंमद शरीफ याला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २ चारचाकी आणि २ दुचाकी वाहने कह्यात घेण्यात आली आहेत. यातील कबिर ए.एम्. हा बनावट अहवाल बनवून देत होता.