गोव्यातील ३ प्रशासकीय अधिकार्यांना ‘आय.ए.एस्.’ अधिकारीपदी बढती मिळणार
पणजी – गोवा लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी झालेल्या ३ अधिकार्यांना भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस्.) अधिकारी म्हणून बढती मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये निखिल देसाई, प्रसन्न आचार्य आणि विजय परांजपे यांचा समावेश आहे. हा निर्णय केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएस्सी) २७ ऑगस्टला झालेल्या बैठकीत घेण्यात आला. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये गोवा लोकसेवा आयोगातील ८ प्रशासकीय अधिकार्यांना भारतीय प्रशासकीय सेवेच्या अधिकारीपदी बढती मिळाली होती.