‘एस्.एस्.आर्.एफ्.’ संकेतस्थळाची सेवा करणारे साधक श्री. पीटर कोर्नाविलीस यांच्यातील शिकायला मिळालेले गुण

श्री. पीटर कोर्नाविलीस

‘एस्.एस्.आर्.एफ्.’ संकेतस्थळाची सेवा करणारे साधक श्री. पीटर कोर्नाविलीस हे धान्यविभागात सेवा करायला आले होते. त्या वेळी त्यांना यंत्राने धान्य चाळण्याची सेवा दिली. भाषेची अडचण असतांनाही त्यांनी जिज्ञासू वृत्तीने यंत्राने धान्य चाळण्याची सेवा शिकून घेतली. यंत्रात धान्य घालण्याच्या जागी ‘एक पोतं धान्य घालू शकतो का ?’, हे त्यांनी जिज्ञासेने विचारून घेतले, तसेच एका पोत्यात त्यांना मुंगी दिसली. तेव्हा त्यांनी ‘त्या पोत्यातील धान्य यंत्रात घालू शकतो का ?’, हे विचारून घेतले. मला त्यांच्यातील जिज्ञासू वृत्ती आणि लक्षपूर्वक कृती करणे, हे गुण शिकायला मिळाले. ‘असे गुण आमच्यातही येऊ देत’, अशी श्रीगुरूंच्या कोमल चरणी आर्ततेने प्रार्थना !’ – श्रीमती गीता प्रभु, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.१०.२०२०)