पर्वरी येथे एका खासगी रुग्णालयात सेवेला असलेल्या एका आधुनिक वैद्यांना मारहाण : दोषीवर कारवाई करण्याची मागणी

अशी मागणी का करावी लागते ? – संपादक 

पणजी, २८ ऑगस्ट (वार्ता.) – पर्वरी येथे एका खासगी रुग्णालयात सेवेला असलेल्या एका आधुनिक वैद्यांना मारहाण केल्याच्या प्रकरणी दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी ‘भारतीय वैद्यकीय संघटने’चे माजी अध्यक्ष डॉ. शेखर साळकर यांनी केली आहे. याविषयी अधिक माहिती देतांना डॉ. शेखर साळकर ट्वीट करून म्हणाले, ‘‘पर्वरी येथील एका खासगी रुग्णालयात सेवेत असलेल्या आधुनिक वैद्यांना मारहाण करण्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. पोलीस या प्रकरणी दोषीवर कारवाई करण्यासाठी किती गंभीर आहेत, याकडे वैद्यकीय क्षेत्रातील लोक लक्ष ठेवून आहेत. दोषीवर कठोर कारवाई करण्याची आमची मागणी आहे. सेवेत असलेल्या आधुनिक वैद्याला मारहाण करणे, हा ‘मेडिकेअर ॲक्ट, २०१३’नुसार गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे.’’