विज्ञापने आणि विविध माध्यमांतून अर्पण मिळवण्याची सेवा करणार्या श्रीमती स्मिता नवलकर यांचा साधनाप्रवास !
परात्पर गुरुदेवांच्या कृपेने अनेक प्रसंगांत रक्षण झाल्याची अनुभूती घेऊन विज्ञापने आणि विविध माध्यमांतून अर्पण मिळवण्याची सेवा करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती स्मिता नवलकर यांचा साधनाप्रवास !
‘श्रीमती स्मिता नवलकर देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करतात. त्या ‘सनातन प्रभात’च्या नियतकालिकांसाठी विज्ञापने मिळवणे आणि अर्पण घेणे, या सेवा करतात. त्यासाठी त्या भारतभर प्रवास करतात. त्यांचा साधनाप्रवास आणि साधना करतांना त्यांना आलेल्या अनुभूती त्यांच्याच शब्दांत येथे दिल्या आहेत.
२२ ऑगस्ट २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या दुसर्या भागात ‘श्रीमती नवलकर यांना परात्पर गुरुदेवांनी अनेक प्राणघातक प्रसंगांमधून वाचवणे’, हे लिखाण पाहिले. आज उर्वरित लिखाण पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/505012.html
७. परात्पर गुरुदेवांनी एका उद्योजकांकडून २ वेळा अर्पण नाकारणे आणि त्यांच्याकडून साधना करवून घेणे
परात्पर गुरुदेवांनी एका उद्योजकांकडून २ वेळा अर्पण नाकारले आणि ‘त्यांनी साधना करायला हवी’, असे सांगितले. त्याप्रमाणे त्या उद्योजकांना सांगितल्यावर त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी साधनेला आरंभ केला. त्यामुळे त्यांच्या मातोश्री संतपदाला पोचल्या आणि त्यांचीही ६१ टक्के आध्यात्मिक पातळी होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्तता झाली.
८. रामनाथी आश्रमात जाण्याची संधी मिळणे
८ अ. विज्ञापनांच्या सेवेसह साधकांचा व्यष्टी आढावा घ्यायला सांगणे : पूर्वी एकदा मला रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात जाण्याची संधी मिळाली होती. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी मला साधना करतांना आलेले वैशिष्ट्यपूर्ण अनुभव, अनुभूती आणि साधनेचा प्रवास लिहून द्यायला सांगितले होते. त्यांनी मला विज्ञापनांसाठी संपर्क करणे आणि व्यष्टी आढावा शिकून घेऊन त्याप्रमाणे जेथे सेवेसाठी जाईन, तेथे या सेवेसमवेत तेथील साधकांचा व्यष्टी साधनेचा आढावाही घ्यायला सांगितले.
८ आ. २२ वर्षांनंतर स्वतःत ईश्वराचे गुण काही प्रमाणात आणण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न होऊ लागणे : व्यष्टी साधनेच्या आढाव्याच्या माध्यमातून सद्गुरु राजेंद्र शिंदे आणि सौ. सुप्रिया माथूर (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांनी माझ्याकडून पुष्कळ प्रयत्न करवून घेतले अन् अजूनही घेत आहेत. त्यामुळे २२ वर्षांनंतर स्वतःत ईश्वराचे गुण काही प्रमाणात आणण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न होऊ लागले. प्रत्येक प्रसंगाचा अभ्यास आणि चिंतन केल्यामुळे मला चुका, स्वभावदोष आणि अहं यांच्या मुळाशी जाणे हळूहळू जमायला लागले अन् आढावा म्हटला की, येणारा ताण नष्ट होऊन मी व्यष्टी साधनेच्या आढाव्याची वाट पाहू लागले. मला आढाव्यातून आनंद मिळू लागला.
९. उत्तम रहाणीमान, सर्व प्रकारचा ऐषाराम आणि पैसा यांपेक्षाही सेवेतून मिळालेला आनंद उच्च कोटीचा असल्याने गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटणे
‘सद्यःस्थितीत व्यवसाय चालू असता आणि मुंबईत निवास असता’, तर किती कठीण झाले असते ?’, याची मी कल्पनाही करू शकत नाही. ‘केवळ परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे आम्ही आश्रमात आलो’, हे लक्षात आले आणि मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘त्यांनी मला व्यवसायातून आणि मायेतून बाहेर काढले’, त्यासाठी मला कृतज्ञता वाटते, नाहीतर मी व्यवहारातच गुंतून पडले असते. व्यवसायाच्या निमित्ताने आमचा देश-विदेशांत पुष्कळ प्रवास झाला आहे. आम्ही उत्तम रहाणीमान, सर्व प्रकारचा ऐष-आराम भोगला, पैसाही मिळवला; परंतु परात्पर गुरुदेव मला सेवेतून जो आनंद देत आहेत, तसा आनंद आम्ही कधी अनुभवला नव्हता. त्यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.
१०. कृतज्ञता आणि प्रार्थना
परात्पर गुरु डॉक्टर माझ्या सतत समवेत राहून माझ्याकडून सेवा करवून घेत आहेत. ते नवीन संकल्पना सुचवतात आणि त्या कृतीत आणून घेतात. मी याची अनुभूती आरंभापासून घेतली आहे. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’चे विशेषांक, सनातन पंचांग, धर्मशिक्षण फलक ग्रंथ, ‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ ग्रंथ, निरनिराळे फ्लेक्स, आश्रम साहित्य’ यांच्यासाठी प्रायोजक मिळवणे अथवा साहित्य अल्प दरात खरेदी करून आणणे, या सर्व सेवा तेच देतात, सुचवतात आणि करवूनही घेतात. ‘त्यांनी या सेवांसाठी माझी निवड केली आणि सेवा करवून घेतली’, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
‘माझे हे आयुष्य मला मिळालेला ‘बोनस’ आहे. त्याचा परात्पर गुरुदेवांच्या राष्ट्र आणि धर्मसंस्थापना यांच्या कार्यात उपयोग करून घ्यावा. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या जिवाचा उद्धार करवून घ्यावा’, अशी त्यांच्या कोमल चरणी संपूर्णपणे शरणागतभावाने प्रार्थना करते.’
(समाप्त)
– श्रीमती स्मिता नवलकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.६.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |