आदर्श वडील !
मुलीच्या कुटुंबियांनी पूर्णवेळ साधना आरंभल्यावर वडिलांना आनंद होणे अन् त्यावरून नातेवाइकांनी उणे-दुणे बोलल्यावर वडिलांनी त्यांना खंबीरपणे उत्तर देणे
आम्ही पूर्णवेळ साधना करण्यास आरंभ केल्यानंतर बाबांना पुष्कळ आनंद झाला. तेव्हा एक नातेवाईक बाबांना म्हणाले, ‘‘तुम्ही मुलीचे आयुष्य तर (साधना करायला लावून) आधीच उद्ध्वस्त केलेत आणि आता नातवाचेही (तिच्या मुलाचेही) आयुष्य उद्ध्वस्त करत आहात.’’ त्या वेळी बाबा त्या नातेवाइकाला खंबीरपणे म्हणाले, ‘‘व्यवसायानिमित्त तुमची मुले विदेशात जाऊन हिंदु संस्कृती विसरतात’, ते तुम्हाला आवडते. माझी मुलगी, जावई आणि नातू ‘साधना म्हणून राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांचे कार्य करतांना जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त होता यावे’, यासाठी सनातनच्या आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करत आहेत, तर त्यांना तुमचा विरोध का ? त्यांच्या या निर्णयाचा मला अभिमानच आहे !’’ त्यानंतर कुठल्याही नातेवाइकाने बाबांना पुन्हा याविषयी विचारले नाही. आता तर त्यांच्यापैकी काही नातेवाईक बाबांना म्हणतात, ‘‘तुम्ही घेतलेला निर्णय चांगला आहे.’
विवाहानंतर मुलीला संसाराच्या अडचणी परात्पर गुरु डॉक्टरांना सूक्ष्मातून सांग’, असे सांगणे अन् तिला धर्माचरण करण्यास प्रवृत्त करणे
‘बाबांनी (श्री. सुरेश काशेट्टीवार यांनी) माझ्या विवाहानंतर मला निक्षून सांगितले, ‘‘आजपासून तू मला काहीही सांगायचे नाहीस. जे काही सांगायचे, ते परात्पर गुरु डॉक्टरांना (सूक्ष्मातून) सांगायचे; कारण तेच तुझ्या संसारातील सर्व अडचणी दूर करून तुझा सांभाळ करतील.’’ एकदा मी सासरी गेल्यानंतर पंजाबी पोषाख घातला. ही गोष्ट समजल्यावर बाबा मला म्हणाले, ‘‘आपली रहाणी, तसेच वेशभूषा यांतून आपले धर्माचरण दिसून येते. त्यामुळे तू पाचवारी किंवा नऊवारी साडी नेस.’’
– सौ. सारिका कृष्णा आय्या (मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.