‘पब्जी’साठी १६ वर्षीय मुलाकडून आईच्या अधिकोषाच्या खात्यातून १० लाख रुपये खर्च !

पालकांनी खडसावल्यावर मुलाचे घरातून पलायन

पालकांनो, आपली मुले भ्रमणभाषवर नेमके काय पहातात, याकडे वेळीच लक्ष द्या आणि त्यांना ‘पब्जी’सारख्या खेळांच्या व्यसनांपासून दूर ठेवा ! – संपादक

मुंबई – येथील १६ वर्षीय मुलाने ‘पब्जी’ खेळण्यासाठी आईच्या अधिकोषाच्या खात्यातून १० लाख रुपये खर्च केले. आई-वडिलांनी याविषयी विचारल्यावर मुलाने जोगेश्वरी येथील घरातून २६ ऑगस्ट या दिवशी पलायन केले. या प्रकरणी पालकांनी तो हरवल्याची तक्रार प्रविष्ट केल्यावर पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि त्याला पालकांकडे सोपवले. मुलाला ‘काही मासांपासून पब्जीचे व्यसन लागले होते’, असे त्याच्या वडिलांनी सांगितले. अधिकोषाच्या संदर्भातील व्यवहार केल्यावर त्याद्वारे भ्रमणभाषवर येणारे लघुसंदेश तो पुसून टाकत (डिलीट) असे. (अशा गोष्टी टाळण्यासाठी पालकांची सतर्कता महत्त्वाची ! – संपादक)