उल्हासनगर येथील शासकीय बालसुधारगृहातील १४ मुलांना कोरोनाची लागण !

ठाणे, २८ ऑगस्ट (वार्ता.) – उल्हासनगर येथील कॅम्प क्र. ५ येथील शासकीय बालसुधारगृहात २५ मुले असून यापैकी १४ मुलांना खोकला आणि उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी केल्यावर ती ‘पॉझिटिव्ह’ आली. १४ पैकी ३ मुलांवर कोविड रुग्णालय येथे, तर ११ मुलांवर कोविड आरोग्य केंद्रात उपचार चालू आहेत. बालसुधारगृहातील इतर मुलांची कोविड चाचणी ‘निगेटिव्ह’ आल्याची माहिती आरोग्य अधिकारी आधुनिक वैद्या राजा रिजवानी यांनी दिली आहे, तर बाधित असलेल्या सर्व मुलांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.