आरोग्य मंत्रालयातील महिला कर्मचार्‍यांनी कामावर रुजू व्हावे ! – तालिबानचे आवाहन

देशात शरीयत लागू करणार्‍या तालिबान्यांना आता आरोग्य यंत्रणा कोलमडल्यामुळे महिलांची आवश्यकता भासू लागली आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक

तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहिन

काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानमधील सार्वजनिक आरोग्य मंत्रालयातील सर्व महिला कर्मचारी पुन्हा एकदा कामावर परतू शकतात. महिलांनी नोकरी करण्यास तालिबान सरकारची हरकत नाही, असे आवाहन तालिबानचा प्रवक्ता सुहैल शाहिन याने ट्वीट करून केले आहे. याआधी समोर आलेल्या वृत्तानुसार अधिकोषांमध्ये (बँकांमध्ये) काम करणार्‍या महिलांना तालिबान्यांनी पुन्हा घरी पाठवत नोकरीवर न येण्याचा आदेश दिला होता. महिलांनी त्यांची नोकरी घरातील पुरुषांना द्यावी, असेही सांगण्यात आले होते.