उत्तरप्रदेशातील ‘सुलतानपूर’ जिल्ह्याचे नाव पालटून ‘कुश भवनपूर’ करण्याचा प्रस्ताव
केंद्र सरकारनेच देशातील गुलामगिरीची चिन्हे असणारी सर्व नावे पालटण्याचा आदेश दिला पाहिजे, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे ! – संपादक
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश महसूल मंडळाकडून राज्यातील सुलतानपूर जिल्ह्याचे नाव पालटून श्रीरामांचे पुत्र कुश यांच्यावरून ‘कुश भवनपूर’ असे ठेवण्याचा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठवण्यात आला आहे. यावर मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. १३ व्या शतकामध्ये या जिल्ह्याचे नाव ‘कुश भवनपूर’ होते. अल्लाउद्दीन खिलजी याने आक्रमण केल्यावर याचे नाव ‘सुलतानपूर’ करण्यात आले. (स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांत गुलामगिरीचे चिन्ह असलेले हे नाव का पालटण्यात आले नाही, याचे उत्तर आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी दिले पाहिजे ! – संपादक)