काबुल बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी केरळमधील १४ धर्मांधांचा सहभाग असल्याची शक्यता
भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी याविषयी काही बोलतील का ? – संपादक
काबुल (अफगाणिस्तान) – येथे ‘इस्लामिक स्टेट खुरासान’ या आतंकवादी संघटनेकडून करण्यात आलेल्या विमानतळाबाहेरील बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी केरळमधील १४ धर्मांधांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच दोघा पाकिस्तान्यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या सर्वांना तालिबानने बगराम कारागृहातून मुक्त केले होते. हे १४ जण वर्ष २०१४ मध्ये केरळच्या मलप्पूरम्, कासारगोड आणि कन्नूर जिल्ह्यांतून सीरियामध्ये गेले होते. त्यानंतर ते अफगाणिस्तानात जाऊन इस्लामिक स्टेट खुरासानमध्ये सहभागी झाले.