६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. राघव प्रतीक गलांडे (वय १ वर्ष ७ मास) याची त्याच्या आईला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. राघव प्रतीक गलांडे एक आहे !
बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा चि. राघव प्रतीक गलांडे याची जन्मापूर्वी आणि जन्मानंतर त्याच्या आईला जाणवली सूत्रे येथे देत आहोत.
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. गरोदरपणी
१ अ. प्रार्थना केल्यावर शारीरिक त्रास अल्प होणे
‘गरोदरपणात मला पुष्कळ त्रास होत होता. मला काहीच खावेसे वाटत नव्हते. मला कशाचा वासही सहन होत नव्हता. मी देवाला प्रार्थना केल्यानंतर मला चांगले वाटायचे. ‘देवच मला सर्व कामांमध्ये साहाय्य करत आहे’, असे मला जाणवत होते.
१ आ. इंजेक्शन न घेऊनही रक्त घट्ट होण्याचा त्रास न होणे
मला रक्त घट्ट होण्याचा त्रास होत होता. आधुनिक वैद्यांनी (डॉक्टरांनी) मला प्रतिदिन एक ‘इंजेक्शन’ घेण्यास सांगितले. काही कारणांमुळे मी एकच मास ‘इंजेक्शन’ घेऊ शकले. पुढे मला ते घेता आले नाही, तरीही मला काहीही त्रास झाला नाही.
१ इ. वाहनातून उतरत असतांना दगडांवर आणि पोटावर पडूनही प्रार्थना केल्यावर केवळ खरचटणे अन् गर्भही सुखरूप असणे
एके दिवशी आम्ही वाहनातून जात असतांना काही कामानिमित्त मला खाली उतरायचे होते. मी चालकाला गाडी थांबवण्यास सांगून दार उघडून उतरत होते. त्या गडबडीत मी खाली पडले. वाहनाचे चाक माझ्या पायावरून गेले आणि मी पोटावर पडले. माझ्याकडून देवाला कळवळून प्रार्थना झाली, ‘देवा, तूच माझे रक्षण कर.’ तेव्हा तेथे पुष्कळ दगड असूनही ‘मी गादीवर पडले आहे’, असे मला जाणवले. मला काही झाले नव्हते. केवळ थोडेसे खरचटले होते. गर्भातील बाळही चांगले होते. तेव्हा माझ्याकडून पुष्कळ शरणागतभावाने कृतज्ञता व्यक्त झाली. गरोदरपणी मी गुरुचरित्र वाचत होते. माझे मंत्रजपाचे उपाय आणि नामजपही चालू होता.
१ ई. पाचव्या मासांत (महिन्यांत) रामनाथी आश्रमाच्या पायर्या चढ-उतार करूनही शारीरिक त्रास न होणे आणि आश्रम पाहिल्यावर सकारात्मकता वाढून ‘शरिरामध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे’, असे जाणवणे
मला ५ वा मास चालू असतांना मी गोव्यातील रामनाथी येथील आश्रम पहाण्यासाठी गेले होते. मला ‘पायर्यांवर चढ-उतार करायचे नाही’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले होते. आश्रम पहातांना पुष्कळ पायर्या चढायच्या होत्या. मला तेवढी शक्ती नव्हती आणि माझी सव्वा वर्षाची मुलगी ईश्वरी माझ्या कडेवर होती. मी प्रार्थना केली आणि त्यानंतर मला पूर्ण आश्रम पहातांना कसलाही त्रास झाला नाही. मी ईश्वरीला कडेवर घेऊनच संपूर्ण आश्रम पाहिला. आश्रमात गेल्यापासून माझ्या मनाची सकारात्मकता पुष्कळ वाढली आणि ती अजून टिकून आहे. तेथून आल्यावर माझा नामजप अधिक भावपूर्ण होऊ लागला. ‘शरिरामध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे’, असे मला जाणवत होते.
२. प्रसुतीच्या वेळी
२ अ. प्रसुतीच्या वेळी भावपूर्ण प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त होऊन अधिक त्रास न होणे
मी प्रसुतीसाठी जात असतांना ‘माझ्या समवेत गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आहेत. ते माझे आणि बाळाचे रक्षण करणार आहेत’, असा माझा भाव होता. त्यामुळे माझ्याकडून सतत प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त होत होत्या. मी प्रसूत झाले, तेव्हा माझा श्रीकृष्णाचा नामजप चालू होता. बाळ जन्माला येईपर्यंत माझा नामजप चालू होता. त्यामुळे मला अधिक त्रास झाला नाही आणि बाळसुद्धा चांगले होते. त्याला पाहिल्यावर माझा भाव पुष्कळ जागृत व्हायचा.
३. जन्मानंतर
३ अ. चि. राघव जन्मला, तेव्हा त्याच्या तोंडवळ्यावर पुष्कळ तेज असल्याचे वाटत होते. त्याला पाहिल्यावर माझी भावजागृती होत होती .
३ आ. तो जन्मतःच वेगवेगळ्या मुद्रा करत होता. आताही तो मुद्रा करतो.
३ इ. तो पुष्कळ शांत, स्थिर आणि सहनशील आहे.
३ ई. सात्त्विकतेची आवड
३ ई १. श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून हसणे : आम्ही आमच्या घरी आलो. आमच्या खोलीमध्ये कृष्णाचे चित्र होते. तेव्हा राघव सतत श्रीकृष्णाच्या चित्राकडे पहायचा आणि हसायचा. तो कधीही जागा झाला की, श्रीकृष्णाच्या चित्राकडे बघत असतो. त्या वेळी ‘तो कृष्णाशी बोलत आहे’, असे मला वाटते.
३ ई २. गुरुदेवांच्या जन्मोत्सवाचा कार्यक्रम आनंदाने ऐकणे आणि अधूनमधून हसणे : तो ३ मासांचा असतांना गुरुदेवांचा एक कार्यक्रम होता. राघव आतील खोलीत होता. तो रडू लागल्याने मी त्याला बाहेर घेऊन आले. तेव्हा तो पुष्कळ आनंदी झाला आणि त्याने पूर्ण कार्यक्रम शांतपणे ऐकला. नंतर गुरुदेवांचा जन्मोत्सव होता. तेव्हाही त्याने पुष्कळ शांतपणे कार्यक्रम ऐकला. तेव्हा तो मधून मधून हसायचा.
३ उ. त्याच्याकडे पाहिल्यावर मन पुष्कळ आनंदी होते. मनातील विचार विसरले जातात. त्याच्याकडून आम्हाला सकारात्मकता मिळते.’
– सौ. वर्षा प्रतीक गलांडे (राघवची आई), बार्शी, सोलापूर. (२४.९.२०२०)
यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यू ट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |