हजारीबाग (झारखंड) मध्ये ख्रिस्ती मिशनर्यांकडून २०० हून अधिक हिंदूंचे धर्मांतर !
‘मी जन्माने हिंदु आहे आणि मरेपर्यंत हिंदूच रहाणार !’ – ७५ वर्षांच्या मंझली मरांडीचा निर्धार
|
हजारीबाग (झारखंड) – जिल्ह्यातील दारु प्रभागामध्ये ख्रिस्ती मिशनरींनी कोरोना महामारीच्या काळात २०० हून अधिक हिंदूंचे धर्मांतर केले आहे. येथील ७५ वर्षांच्या मंझली मरांडी या महिलेच्या कुटुंबातील सर्व धर्मांतरित झाले असतांना तिने मात्र धर्मांतरित होण्यास नकार दिला आहे. तिने ख्रिस्ती मिशनर्यांची सर्व प्रलोभने धुडकावून लावली असून ‘मी जन्माने हिंदु असून मरेपर्यंत हिंदूच रहाणार’, असा ठाम निर्धार केला आहे.
१. दारु प्रभागामध्ये ख्रिस्ती मिशनरींकडून पिपचो येथील मिशन विद्यालयाच्या आडून मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर करणे चालू आहे. त्यांनी या भागातील खुर्द अककुम्बा, बंधु टोला, पिपरा टोला, झरना इत्यादी ठिकाणच्या हिंदूंचे धर्मांतर केले आहे. या धर्मांतरासाठी मिशनरींनी लोकांना अनेक प्रलोभने दिली आहेत.
२. या प्रलोभनांना मंझली मरांडी ही महिला अपवाद ठरली आहे. मंझली म्हणाल्या की, तिला सोडून तिच्या कुटुंबातील सर्व ९ सदस्यांनी ख्रिस्ती पंथ स्वीकारला आहे. ती ख्रिस्ती झालेल्या लोकांसमवेत रहात आहे. ती हनुमानाची भक्त असून इतर देवतांची पूजा करते. ती कुटुंबातील सर्वांना हिंदु धर्मात परत येण्यासाठी विनंती करत आहे; परंतु सर्वजण तिच्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
३. मंझली म्हणाल्या, ‘‘बजरंगबली आमची देवता आहे. आम्ही आजीवन हिंदूच रहाणार. मला माझ्या धर्मापासून कुणीही वेगळे करू शकत नाही. लोभात पडून कुणीही आपला धर्म पालटू नये.’’
४. मंझली मरांडी यांची दोन्ही मुले बादल आणि मोहन १८ मासांपूर्वीच ख्रिस्ती झाले आहेत. दारु पोलीस ठाण्यापासून हे मिशन विद्यालय केवळ १०० मीटर अंतरावर असतांनाही पोलीस आणि प्रशासन यांना त्याची जाणीवही नाही.