चौल (रामनाथ) येथील श्री नवनाथ संप्रदायाचे पू. नारायण वार्डेगुरुजी यांचा देहत्याग !
रामनाथ (जिल्हा रायगड) – चौल येथील श्री नवनाथ संप्रदायाचे संत पू. नारायण वार्डेगुरुजी (वय ९२ वर्षे) यांनी २६ ऑगस्ट या दिवशी सकाळी ९.४५ वाजता देहत्याग केला. त्यांच्या पश्चात २ मुले, ३ सुना, नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे. त्यांची भक्त मंडळी महाराष्ट्रात सर्वत्र आहेत.
पू. गुरुजी दैनिक ‘सनातन प्रभात’चे बारकाईने वाचन करत. ते गेली अनेक वर्षे सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश आणि सनातन संस्थेच्या संस्कार वह्या देत असत. चौल येथील डोंगरावर असलेल्या दत्तमंदिरात ते प्रत्येक गुरुवारी चालत जाऊन दर्शनही घेत.