भाडेतत्त्वावरील ७७ चारचाकी मद्य वाहतुकीसाठी वापरल्या !
खोटे सांगून मद्य वाहतुकीसाठी चारचाकी वापरणाऱ्यांना कठोर शिक्षाच हवी ! – संपादक
पुणे – सरकारी अधिकार्यांच्या उपयोगासाठी चारचाकी हवी असल्याचे सांगून भाडेतत्त्वावर घेतलेल्या ७७ चारचाकी मद्य वाहतुकीसाठी वापरल्याचे पोलिसांच्या अन्वेषणात निष्पन्न झाले आहे. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या ७७ चारचाकींपैकी ४६ चारचाकी येरवडा पोलिसांनी शासनाधीन केल्या आहेत. या गुन्ह्यात अयान उपाख्य अँथोनी छेत्तीयार यांच्यासह चौघांना अटक करून अन्य तिघांवर गुन्हा नोंद केला आहे.