शिक्षकदिनानिमित्त ग्रामीण मराठी साहित्य परिषद आणि शिवमार्ग वृत्तवाहिनी यांच्या वतीने ‘गुरुवंदना’ या ऑनलाईन काव्यस्पर्धेचे आयोजन
ठाणे, २७ ऑगस्ट (वार्ता.) – ग्रामीण महाराष्ट्रातील साहित्यिकांसाठी विविध उपक्रम राबवणार्या ग्रामीण मराठी साहित्य परिषद (ग्रामसाप) आणि शिवमार्ग वृत्तवाहिनी यांच्या वतीने शिक्षकदिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय ‘गुरुवंदना’ या ऑनलाईन काव्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या कवींना या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल त्यांनी आपल्या स्वरचित कवितेचे चित्रीकरण संस्थापक महेश धानके यांच्या ९६८९९९५००० या व्हॉट्सअॅप क्रमांकावर ३० ऑगस्ट २०२१ पर्यंत पाठवावे, असे आवाहन स्पर्धेचे प्रमुख मुकेश विशे यांनी केले आहे.
कवितेचे चित्रीकरण पाठवतांना कविता शिक्षकांचा गौरव करणारी असावी, कवितेचे चित्रीकरण करतांना भ्रमणभाष आडवा धरून चित्रीकरण करावे. कविता सादर करण्यापूर्वी नाव, पत्ता आणि कवितेचे शीर्षक, तसेच ग्रामसाप अन् शिवमार्ग वृत्तवाहिनी आयोजित गुरुवंदना या स्पर्धेसाठी कविता सादर करत असल्याचा उल्लेख करावा. कविता सादरीकरणाचे चित्रीकरण अधिकाधिक ५ मिनिटांचे असावे. कवितेच्या चित्रीकरणाला मिळालेल्या ‘लाईक्स’च्या आधारे ५० टक्के आणि ५० टक्के सादरीकरण यांच्या आधारे परीक्षण केले जाणार आहे. स्पर्धा सर्वांसाठी खुली असून कोणतेही प्रवेशशुल्क आकारले जाणार नाही. उत्कृष्ट ६ कवींना विशेष पारितोषिके देण्यात येणार असून सहभागी झालेल्या सर्वांना ‘डिजिटल’ प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.