‘शौर्यजागृती शिबिरा’त स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग घेतांना आलेल्या अनुभूती
१. प्रशिक्षणवर्गाच्या आरंभी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पुष्कळ प्रार्थना होणे आणि वर्ग घेतांना ‘प.पू. गुरुदेवच वर्गात सर्वत्र फिरत आहेत’, असे जाणवणे : ‘लातूर जिल्ह्यातील चांडेश्वरी गावात २६ ते ३०.१२.२०१९ या कालावधीत ५ दिवसीय ‘शौर्यजागृती शिबिराचे (‘क्रॅश कोर्स’चे) आयोजन केले होते. त्या वेळी स्वरक्षण प्रशिक्षणवर्गाच्या आरंभी माझ्याकडून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पुष्कळ प्रार्थना झाल्या. प्रशिक्षणवर्ग घेत असतांना ‘प.पू. गुरुदेवच वर्गात सर्वत्र फिरत आहेत’, असे मला जाणवले.
२. मुलांना दंडसाखळी शिकवल्यावर एका मुलाने दंडसाखळीतून चंदनाचा सुगंध आल्याचे सांगणे आणि त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टर सतत समवेत आहेत’, याची जाणीव होऊन कृतज्ञता वाटणे : शिबिरातील ३ दिवस मुलांना दंडसाखळी शिकवण्यात आली. वर्ग संपल्यानंतर वर्गातील एका मुलाने मला विचारले, ‘‘दंडसाखळ्या चंदनाच्या आहेत का ? चंदनाचा सुगंध येत आहे.’’ तेव्हा मनातून गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त होऊन माझी भावजागृती झाली. शिबिराच्या पाचव्या दिवशी त्या मुलाने येऊन सांगितले, ‘‘दादा, खरं सांग. मला आजही चंदनाचा सुगंध आला.’’ तेव्हाही मला गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘परात्पर गुरु डॉक्टर प्रत्येक क्षणी माझ्या समवेतच आहेत आणि हेच सांगण्यासाठी मला ही अनुभूती आली’, असे मला वाटले. ‘माझी पात्रता नसतांनाही गुरुदेवांनी मला एवढा आनंद दिला’, यासाठी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. मिनेश पुजारे, सोलापूर (३०.१२.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |