तत्परतेने आणि भावपूर्ण सेवा करणार्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील कु. गौरी मुद्गल (वय २० वर्षे) !
श्रावण कृष्ण पक्ष षष्ठी (२८.८.२०२१) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ सेवा करणार्या कु. गौरी मुद्गल यांचा विसावा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या लहान बहिणीला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
कु. गौरी मुद्गल यांना विसाव्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. व्यवस्थितपणा : ‘गौरीताईचा खण व्यवस्थित असतो. एका संतांनी तिच्या खणाकडे बघून सांगितले, ‘‘खणातून सात्त्विक स्पंदने येत आहेत. खणाकडे पाहून भाव जागृत होतो आणि आनंद होतो. तेथे चैतन्य जाणवते.’’
२. मी लहानपणी पुष्कळ मस्ती करायचे, भांडायचे आणि रागवायचे; पण ताई मला नेहमी समजून घेत असे.
३. ती मला तिला दिलेले चॉकलेट द्यायची आणि सांगायची, ‘‘तू खा. तुला आनंद होईल.’’
४. ती आहे त्या परिस्थितीत समाधानी असते.
५. तिला तिच्या चुका सांगितल्यास ‘त्या चुका पुन्हा होणार नाहीत’, यासाठी ती प्रयत्न करते.
६. आईला आध्यात्मिक त्रास होत असतांना तिला साहाय्य करणे : आईला आध्यात्मिक त्रास होत असल्यास ताई आईला प्रत्येक गोष्टीत साहाय्य करते. मी काही वेळा सेवेतील व्यस्ततेमुळे आईला साहाय्य करू शकत नाही. त्या वेळी ताई आईला साहाय्य करते. त्या दोघींमुळेच मी साधना चांगली करू शकते.
७. संतांनी गौरीताईविषयी काढलेले कौतुकोद्गार !
अ. एका संतांनी गौरीताईविषयी सांगितले, ‘‘गौरी नेहमी सेवेसाठी तत्पर असते ना ! ती खारुताईसारखी पळत सेवा करते. ती सेवा चांगली करते.’’
आ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगितले, ‘‘गौरी मनापासून रांगोळी काढते. तिने काढलेल्या रांगोळीतून तिचा भाव दिसून येतो.’’
– कु. अमृता मुद्गल (लहान बहीण, वय १७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.२.२०२१)