अफगाणिस्तानमधील शरणार्थी उघूर मुसलमान भीतीच्या छायेत !
चीनच्या दबावामुळे तालिबानी आतंकवादी उघूर मुसलमानांना चीनच्या कह्यात देण्याची शक्यता
तालिबान्यांचे ढोंगी मुसलमानप्रेम ! तालिबानी काश्मिरी किंवा पॅलिस्टिनी मुसलमान यांच्या कथित मानवाधिकारांविषयी बोलतात; मात्र चीनच्या भीतीमुळे तेथील उघूर मुसलमानांवर होणार्या अत्याचारांविषयी बोलत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक
नवी देहली – चीनच्या शिनजियांग प्रांतातून पलायन करून अफगाणिस्तानमध्ये शरण घेतलेल्या उघूर मुसलमानांवर आता पुन्हा संकट ओढवले आहे. चीनच्या सांगण्यावरून तालिबानी आतंकवादी या उघूर मुसलमानांना पुन्हा शिनजियांग प्रांतात पाठवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. असे केल्यास ‘चीन या उघूर मुसलमानांना शिबिरात ठेवून त्यांच्यावर अत्याचार करील’, अशीही भीती व्यक्त केली जात आहे. सध्या अफगाणिस्तानमध्ये २ सहस्र उघूर मुसलमान रहात आहेत.
अफगाणिस्तानमध्ये अनेक वर्षांपासून रहाणार्या उघूर मुसलमानांना नागरिकत्वही मिळाले आहे; मात्र सरकारी कागदपत्रांवर त्यांना ‘चिनी निर्वासित’ असे म्हटलेले आहे. त्यामुळे त्यांची ओळख उघड होऊ शकते. तालिबान म्यानमार आणि पॅलेस्टाईन येथील पीडित मुसलमानांविषयीचे सूत्र उपस्थित करत असतो; मात्र उघूर मुसलमानांवरील चीनकडून होणार्या अत्याचारांविषयी मौन बाळगत आहे. त्यामुळे तालिबान खोटे आरोप करून उघूर मुसलमानांना चीनकडे सोपवू शकतो.