स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने कोल्हापूर जिल्ह्यात ४ शाळांमध्ये ‘ऑनलाईन क्रांतीगाथा प्रदर्शना’चे आयोजन !

कोल्हापूर – स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यात ४ शाळांमध्ये ‘ऑनलाईन क्रांतीगाथा प्रदर्शना’चे आयोजन करण्यात आले होते. देशासाठी अनेक क्रांतीकारकांनी बलीदान केले. यातील अपरिचित क्रांतीकारकांची माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली, तसेच ‘स्लाईड’च्या माध्यमातून त्यांचे छायाचित्र असणारी माहिती विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. याचा लाभ २६५ विद्यार्थी आणि शिक्षक यांनी घेतला.

१. या वेळी राष्ट्रध्वजाचा मान राखण्याविषयी प्रबोधन करण्यात आले, तसेच विद्यार्थ्यांना ‘वन्दे मातरम्’ गीताविषयी माहिती सांगून ते संपूर्ण ऐकवण्यात आले.

२. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या प्रश्नमंजुषा उपक्रमाविषयीची माहिती सांगण्यात आली. या उपक्रमासाठी कोल्हापूर येथील न्यू हायस्कूल, आनंदीबाई नारायणराव सरदेसाई हायस्कूल, टोप संभापूर हायस्कूल, तसेच गडहिंग्लज येथील किलबिल विद्यामंदिर या शाळांमधील सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचे सहकार्य लाभले.

३. शाळांनी या उपक्रमाचे कौतुक करून ‘शाळेसाठी अजूनही काही असेल, तर सांगा’, असा अभिप्राय सांगितला.